मुंबई : भीमा कोरेगाव दंगलीची चौकशी झाली तर भाजपाचे दंगल घडवण्याचे षडयंत्र उघडकीस येईल या भितीनं भाजपने हा तपास एनआयए कडे सोपवला आहे, असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भिमा कोरेगाव दंगलीची जी केस होती ज्याची चौकशी पुणे पोलिस करत होतं. ते पुर्णपणे चुकिच्या पद्धतीने करत होतं. फडणवीस सरकारच्या सांगण्यावरुन हे कारस्तान रचलं गेलं होतं, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
भीमा कोरेगाव दंगलीची चौकशी झाली तर भाजपाचे दंगल घडवण्याचे षडयंत्र उघडकीस येईल म्हणून एनआयए कडे देण्यात आली आहे pic.twitter.com/I9G1tZQnj3
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 24, 2020
जे खरे गुन्हेगार आहेत ते भाजपच्या सांगण्यावरून दंगलं घडवत होतं. आणि जे निर्दोष आहेत त्यांना गोवण्याचा प्रयत्न चालू आहेत. हे भाजपचं षडयंत्र जेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या लक्षात आलं. तेव्हा या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्याची कारवाई सुरु झाली होती, असंही ते म्हणाले.
दरम्यान, या तपासासाठी दोन वर्ष का लागले? असा सवाल सचिन सावंत यांनी भाजपला केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“दोन झेंड्यांची योजना करणं घसरलेल्या गाडीचे लक्षण”
…तर ती चुकीची गोष्ट आहे; रोहित पवारांचा भाजपला इशारा
भीमा कोरेगाव दंगलीमागे देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र- शरद पवार
मी भगवा खाली ठेवलेला नाही, तर आमचं अंतरंगच भगवं आहे- उद्धव ठाकरे