Home महाराष्ट्र …म्हणून महाराष्ट्रात परत लॉकडाऊन; निलेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

…म्हणून महाराष्ट्रात परत लॉकडाऊन; निलेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधलाय.

14000 ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, महाराष्ट्रात आंदोलने झाली तेव्हा कोरोनाची आकडेवारी वाढली नाही मात्र अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना वाढला?, असा सवाल उपस्थित करत निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या संकटात लोकांच्या नोकऱ्या, बँकेचे हफ्ते, लाईटबील घेऊनसुद्धा ठाकरे सरकारला अधिवेशनाला जायचं नाही म्हणून महाराष्ट्रात परत लॉकडाऊन, असं निलेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“देऊळ बंद! वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेगावचे गजानन महाराज मंदीर पुन्हा बंद”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय; म्हणाले

“नाशिकमध्ये आजपासून रात्री 11 ते पहाटे 5 संचारबंदी”

“राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”