Home महाराष्ट्र … तर 48 तासात मला कर्नाटकला जावं लागेल; शरद पवारांचा सरकारला इशारा

… तर 48 तासात मला कर्नाटकला जावं लागेल; शरद पवारांचा सरकारला इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिका संघटनेने केलेल्या या राड्यानंतर महाराष्ट्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीने माझ्याशी संपर्क केला आहे. राज्य सरकारने काही जाहीर केलं नंतर त्यात काही बदल केले हे ठिक आहे. पण या सर्व गोष्टी केवळ राज्य सरकार काय करतयं हे बघून चालणार नाही., असं शरद पवार यांनी म्हटलं.

हे ही वाचा : बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड; महाराष्ट्रात मनसे आक्रमक

आता जे झालं हेच उद्याच्या २४ ते ४८ तासात पूर्ण संपलं नाही तर माझ्यासह सगळ्यांना बेळगावच्या लोकांना धीर द्यायला जावे लागेल., असं शरद पवार म्हणाले.


आपण अजूनही संयम दाखवून आहोत. जर दुर्दैवाने हे असेच चालू राहिले तर काय होईल हे कोणाला सांगता येणार नाही. कर्नाटक सरकारची भूमिका जी सातत्याने मांडली जात आहे तशी भूमिका या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांकडून मांडली जात नव्हती. आताच्या मुख्यमंत्र्यांनी ती घेतली.

आता नजरेसमोर निवडणुका आहेत म्हणून असा प्रकार घडत आहे अशी शंका उपस्थित होते. परंतु निवडणुका लोकशाहीत सगळेच लढत असतो पण माणसा माणसात कटुता वाढणे हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक आहे. जर राजकीय स्वार्थासाठी कोणी असे काही करत असेल तर ते निषेधार्ह आहे., असंही पवार म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रातील सत्ता एकदा माझ्या हातात द्या, अन्…; राज ठाकरेंचं मोठं विधान

विराट मोर्चा काढत आहेत त्यांना…; मुख्यमंत्री शिंदेंचं, ठाकरेंना प्रत्युत्त

“महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात आता ठाकरे रस्त्यावर; ‘या’ तारखेला महाविकास आघाडीचा विराट मोर्चा”