आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. यातच ठाकरे गट-मनसे युती होणार, अशा चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. आता यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या युतीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
ज्या निष्ठावंत सैनिकांनी गेली अनेक वर्षे पक्षासाठी रक्त सांडले, त्यांना नाराज करायचे नाही म्हणून आतापर्यंत मनसेशी युती केली नाही, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. माजी नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते.
ही बातमी पण वाचा : शरद पवार यांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर; म्हणाले, केंद्र सरकारने…
मी मुख्यमंत्री असताना फुटलेल्या सर्व आमदारांना एका खोलीत डांबून ठेवू शकलो असतो, पण ते अगोदरच मनाने फुटले होते. त्यांना खोलीत डांबून ठेवण्यात काय अर्थ होता, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मंत्री संजय राठोड आणि भावना गवळी यांना धूळ चारण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सूचनाही उद्धव ठाकरेंनी लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत दिल्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
“पवार काका-पुतण्यांमुळे डोकं फुटायची वेळ येईल; ‘या’ आमदाराचं विधान चर्चेत”
“सांगलीत, काँग्रेसकडून उमेदवार ठरला, भाजपमध्ये उमेदवार बदलाचे संकेत”
शरद पवार म्हणाले, अजित पवार आमच्यासोबतच, राष्ट्रवादीत फूट नाही, आता भाजपची प्रतिक्रिया, म्हणाले…