Home महाराष्ट्र शरद पवार यांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर; म्हणाले, केंद्र सरकारने…

शरद पवार यांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर; म्हणाले, केंद्र सरकारने…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे केलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी केलं, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नाशिकमध्ये कांद्याची काय स्थिती आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत पाहिजे. कांदा उत्पादन करण्यासाठी जो खर्च येतो त्याची रक्कम त्याच्या पदरात पडायला पाहिजे, ती मागणी पूर्ण करायची असेल तर कांदा जगात पोहोचायला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “पवार काका-पुतण्यांमुळे डोकं फुटायची वेळ येईल; ‘या’ आमदाराचं विधान चर्चेत”

महाराष्ट्राच्या बाहेर हा कांदा जात असताना मोदी सरकारने या कांद्यावर प्रचंड कर बसवला”, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के कर बसवला. एवढी एक्सपोर्ट ड्यूटी बसवल्यानंतर बाहेरच्या देशात कांद्याला गिऱ्हाईक मिळेना. त्याचा परिणाम म्हणजे देशात कांद्याचे भाव पडले. अनेक लोकांनी आंदोलन केलं. संघर्ष केला. सत्याग्रह केला. पण त्याची दखल घेतली गेली नाही. केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे ढुंकून पाहिलं नाही”, असा आरोपही शरद पवारांनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“सांगलीत, काँग्रेसकडून उमेदवार ठरला, भाजपमध्ये उमेदवार बदलाचे संकेत”

शरद पवार म्हणाले, अजित पवार आमच्यासोबतच, राष्ट्रवादीत फूट नाही, आता भाजपची प्रतिक्रिया, म्हणाले…

गुवाहाटीला जाऊन काय मिळालं? बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…