आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. यात शिंदे गटातील संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. पण पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याने विरोधकांसह भाजपातील काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. यावरून आता संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात पुणे पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केली असून आपल्याला क्लिन चीट मिळाली आहे, अशी माहिती संजय राठोड यांनी यावेळी दिली. मागील पंधरा महिन्यांपासून मी आणि माझं कुटुंब मानसिक तणावात होतं. त्यातून कुणीही जाऊ नये. गेली 30 वर्षे राजकीय-सामाजिक जीवनात मी वावरत आहे. चार वेळा प्रचंड मताधिक्यानं निवडूनही आलो आहे. अशा स्थितीत माझं राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रकार झाला. त्या सर्व परिस्थितीला मी सामोरं गेलो. माझ्यावर आरोप झाल्यानंतर निष्पक्ष चौकशी व्हावी, म्हणून मी स्वत: मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण माझ्यावर झालेल्या आरोपात काहीही तथ्य आढळलं नाही, याबाबतच पत्रक पुणे पोलिसांनी जारी केलं आहे, असं राठोड म्हणाले.
हे ही वाचा : …म्हणून संजय राठोड यांचा मंत्रीमंडळात समावेश केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा
दरम्यान, न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर माझा विश्वास होता, म्हणून मी आतापर्यंत शांत होतो. पण तपासानंतर आता सर्व सत्य बाहेर आलं आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की, मलासुद्धा परिवार आहे, मुलंबाळं आहेत, पत्नी आहे, माझे वयोवृद्ध आई वडील आहेत. अशा गोष्टीचा किती त्रास होतो, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. आतापर्यंत मी शांत होतो, पण येथून पुढे असंच वातावरण राहिलं तर मी कायदेशीर मार्गही अवलंबणार आहे. संबंधितांना कायदेशीर नोटीसही पाठवणार आहे, असा इशारा राठोड यांंनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
मुतायचे लय वांदे हायेत म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाट यांचं भन्नाट उत्तर, म्हणाले…
राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
एका संजयने मविआ सरकार बुडवलं, आता मंत्रीमंडळातील संजय, या सरकारचं…; मनसेचा टोला