Home महाराष्ट्र “…मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का?”; मनसेचा सवाल

“…मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का?”; मनसेचा सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा काल अयोध्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधणार असल्याची घोषणा अयोध्येत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावरुन मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरेवर निशाणा साधलाय.

नवी मुंबईत महाराष्ट्र भवनासाठी जागा आरक्षित असूनही तिथे साधी विट रचता आला नाही. पक्षप्रमुख मागच्यावेळी अयोध्येत येऊन महाराष्ट्र भवन बांधणार म्हणून घोषणा करतात. पुढे काहीच नाही. आता छोटे नवाब महाराष्ट्र भवनासाठी जागा मागणार. मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का? बोलघेवडे सरकार, असं गजानन काळे म्हणाले आहेत.

हे ही  वाचा : गोपाळकृष्ण शाळेत मोठ्या दिमाखात ‘ प्रवेशोत्सव ‘ साजरा

दरम्यान, जनतेला दिलेली वचनं पाळणं हेच शिवसेनेच हिंदुत्व – छोटे नवाब. मग औंरंगाबादचे संभाजीनगर कधी करताय मशिदीवरचे भोंगे कधी उतरणार? आणि रस्त्यावरचा नमाज कधी बंद होणार? आदरणीय बाळासाहेबांनी जनतेला दिलेली वचनं पाळणं हे शिवसेनेच्या हिंदुत्वात बसत नाही का? असा उलट सवालही गजानन काळे यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मध्यरात्री मनसेचे वसंत मोरे यांनी लेकूरवाळीला केली ‘ही’ मदत; PMPL वाहकाला आणि चालकाला केला सलाम

जयंत पाटील यांच्या गाडीत खासदार संजय काका पाटील; विधानपरिषदेसाठी भाजप-राष्ट्रवादी एकत्र?; चर्चांना उधाण

“शिवसेनेची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”