आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच आव्हाडांनी भाजपविषयी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : “कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार पडणार?; ‘हा’ माजी आमदार भाजपच्या वाटेवर?”
आम्हांला भाजप काही फार लांब नाही, आम्ही कोणाबरोबर युती, आघाडी करायची याचे सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा आव्हाडांनी शिवसेनेला दिला. ते राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.
मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आम्हाला फार लांब नाही. आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची. तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत , असं आव्हाड म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
परिवहन मंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम; केली ‘ही’ महत्त्वाची सूचना”
“जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो, राजकीय चर्चांना उधाण”
भाजप नेते किरीट सोमय्यांनी आता धनंजय मुंडेंवर केला ‘हा’ गंभीर आरोप, म्हणाले…