पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवी देण्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्रसिद्ध भाषातज्ज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी यासंदर्भात नरेंद्र मोदींवर आरोप केला आहे. संसदेत शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना नरेंद्र मोदी यांनी या आंदोलकांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. हा प्रकार हेटाळणी करण्याचा असून ही एकप्रकारे शिवी असल्याचं गणेश देवी यांचं मत आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आंदोलन करणाऱ्या लोकांना आंदोलनजीवी म्हणणं ही त्यांची एकप्रकारे हेटाळणी आहे, हा स्वातंत्र्य लढ्याच्या प्रक्रियेचा अपमान आहे. स्वातंत्र्य लढा आणि संयुक्त महाराष्ट्र निर्मिती लढ्यात लढलेल्या लोकांना मोदींनी शिवी दिली आहे, असं गणेश देवी म्हणाले.
दरम्यान, संसदेच्या सर्वोच्च सभागृहातून मोदींनी सामान्य माणसाचा अपमान केला आहे, असंही गणेश देवी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी
भाजपा नेते किरीट सोमय्यांना अलिबाग पोलिसांनी घेतलं ताब्यात
“गिर गये तो भी टांग उपर, अशी चंद्रकांत पाटलांची अवस्था”
मोठी बातमी! साताऱ्यात सहा शिवशाही बसला भीषण आग
एका वर्षात नेमकं काय बदललं?; हिंगणघाट प्रकरणावरुन चित्रा वाघ यांचा सवाल