Home महाराष्ट्र “शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्येच आहेत, ते भाजप सोडून गेलेले नाहीत”

“शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्येच आहेत, ते भाजप सोडून गेलेले नाहीत”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव करत विजय मिळवला. म्हणून आता ज्ञानदेव रांजणे यांचा भाजपकडून सत्कार करण्यात आला. सत्कारसमारंभा प्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  बोलत होते.

ज्ञानदेव रांजणे यांची शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

हे ही वाचा : “ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर”

भाजपचं सरकार सध्या राज्यात नाही. गेल्या दोन वर्षांपासून शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजप सोडतील अशा अफवा आहेत. मात्र, शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये चांगलं काम केले आहे. ते भाजप सोडून गेले नाहीत. हे त्यांचे मोठेपण आणि भाजपचे यश आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत रांजणे यांनी मिळवलेला हा विजय महत्त्वपुर्ण आहे. त्यामुळेे त्यांचा सत्कार करण्यासाठी आलो होतो., असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच शिवसेना संपवायचं ठरवलेलं दिसतंय; चंद्रकांत पाटलांची टीका

तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

“उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला”