Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच शिवसेना संपवायचं ठरवलेलं दिसतंय; चंद्रकांत पाटलांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच शिवसेना संपवायचं ठरवलेलं दिसतंय; चंद्रकांत पाटलांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : ‘आपली खुर्ची मजबूत आहे का?” हे मुख्यमंत्र्यांना सारखं तपासावं लागतं. मुख्यमंत्र्यांनीच शिवसेना पक्ष संपवायचे ठरवल्याचे दिसून येते, अशी बोचरी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा उमेदवारांचा सत्कार करण्यासाठी चंद्रकांत पाटील सांगलीत आले होते. यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा कमळ चिन्हावरच लढवणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. भाजपाचे चिन्ह घराघरात पोहचवण्यासाठी ताकदीने कामाला लागा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या घरी जाण्याची पद्धत मी मोडून काढत आहे. सांगलीत बलाढ्य असल्याने भाजपाने पॅनलचा आग्रह धरला आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपा संघटितपणे उभी राहिली. राजकारणात काहीवेळा हवे ते घडत नाही. तरीही अल्पावधीत मिळालेले यश कौतुकास्पद आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला”

कोकणात शिवसेनेचा राष्ट्रवादीला मोठा दणका; राष्ट्रवादीच्या सरपंच्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

“युझवेंद्र चहल RCB तून बाहेर; विराट कोहलीसह ‘हे’ खेळाडू संघात कायम”