आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास घराघरांत पोहचवणारे शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचं आज निधन झालं. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात जाऊन बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतलं. तसंच ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील कपात कमी करणार की नाही?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानादेखील वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं याबाबत त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते मार्गदर्शक तर होतेच; परंतु मला पितृतुल्यही होते, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
बाबासाहेब मला नेहमी सांगत, महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेले तिकडे जायची. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला, असं म्हणत राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली.
इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली ! #शिवशाहीर #श्रद्धांजली pic.twitter.com/x7xRdQzalr
— Raj Thackeray (@RajThackeray) November 15, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नीला काँग्रेसकडून पोटनिवडणूकीची उमेदवारी जाहीर”
संप मागे घ्या, उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल- अनिल परब
“वर्ध्यात राजकीय भूकंप; भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा पक्षाला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश”