Home महाराष्ट्र राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील कपात कमी करणार की नाही?; अजित पवारांनी दिलं उत्तर,...

राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील कपात कमी करणार की नाही?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पंढरपूर : केंद्र सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीनेही इंधनात कपात करावी, अशी आक्रमक मागणी विरोधी पक्ष भाजपकडून होत आहे. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नीला काँग्रेसकडून पोटनिवडणूकीची उमेदवारी जाहीर”

महाराष्ट्राला सध्या दुसरं कोणतं उत्पन्नाचं साधन नाही, त्याचबरोबर पगार आणि दैनंदिन खर्च मात्र तसाच आहे. त्यामुळे सध्यातरी इंधनावरील कर कपात शक्य नसल्याचं स्वत: उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हटलं. कार्तिकी एकादशीनिमित्त ते आज पंढरपुर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, आगामी अधिवेशनापुर्वी जर करामध्ये कपात करायची असेल तर किती नुकसान सहन करावं लागेल, याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

संप मागे घ्या, उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल- अनिल परब

“वर्ध्यात राजकीय भूकंप; भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा पक्षाला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश”

शिवसेना-भाजप युतीबद्दल चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…