Home नागपूर “वर्ध्यात राजकीय भूकंप; भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा पक्षाला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश”

“वर्ध्यात राजकीय भूकंप; भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा पक्षाला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

वर्धा : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे.

भाजपचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शिरीष गोडे यांनी पक्षाचा राजीनामा देत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर वर्धा जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : शिवसेना-भाजप युतीबद्दल चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

गोडे यांनी 2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मागील काही दिवसांपासून गोडे भाजपाच्या कार्यप्रणालीवरून अस्वस्थ होते. तसेच दोन महिन्यांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा देत असल्याचे पत्र त्यांनी पाठवलं होतं.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्ष उदासीन आहे. बोलणाऱ्यास गप्प केले जाते. जनतेच्या प्रश्नाऐवजी भलत्याच गोष्टीवर वाद केल्या जातात, असे आक्षेप गोडेंनी नोंदविले होते. अखेर गोडे यांनी भाजपाला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवांचं दर्शन; अर्पण केली श्रद्धांजली

मोठी बातमी! चित्रा वाघ यांच्यावर भाजप सोपविणार ‘ही’ मोठी जबाबदारी”

पेट्रोल, गॅस दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक! ‘स्मृती इराणी कुठे आहेत?; भाई जगताप यांचा सवाल