आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले असून शिवसेनेनेही आपली कंबर जोरदार कसली आहे. शिवसेनेने महापालिका निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली आहे, आज मध्य नागपुरातील एका बड्या नेत्याने हाती शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेचे आमदार दुष्यंन्त चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे, दीपक कापसे, नितीन तिवारी, सुरेश साखरे, उप जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर झोडे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पूर्व नागपूरचे भाजपचे माजी उपाध्यक्ष व डॉ दळवी स्मारक चे संचालक महेंद्र आडीकने यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी पूर्व नागपूरचे संघटक आलोक भगत यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी शिवसेनेचे इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
खड्ड्यात गेलेल्या पक्षानं आम्हांला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये; शिवसेनेचा पलटवार
राज ठाकरेंनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही- गुलाबराव पाटील
“राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच; भाजपच्या ‘या’ आमदाराचा असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश”
“सरकारनं एकदा निर्णय घेतला की, समाधानीच रहायचं असतं”