आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दादरा नगर-हवेलीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर विजयी झाल्या. आता शिवसेना आणखी एका राज्यात निवडणूक लढणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे , आज माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली.
हे ही वाचा : स्वाभिमान विकून वसुलीसाठी….; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका
दादरा नगर-हवेलीत झालेला विजय हा जनतेचा विजय आहे. शिवसेनेने केलेल्या कामांमुळे महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेचा खासदार निवडून आला. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात उतरण्यासाठी तयार आहे. दादरा नगर-हवेलीत शिवसेनेचा मोठा विजय झालाय. पक्ष संघटना वाढीपेक्षा न्याय मिळवण्यासाठी हा विजय महत्वाचा होता. अन्याया विरोधातील हा लढा होता. आता शिवसेना इतर राज्यातही निवडणूक लढणार आहे. आम्हाला विजयाची अपेक्षा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, गोव्यासह आणखी एका राज्यात शिवसेना निवडणूक लढणार आहे. कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले. त्यांनी केलेल्या कामांची दखल जनतेने घेतली आहे, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
अजित पवार बनवाबनवी, लोकांची फसवा-फसवी थांबवा; किरीट सोमय्यांचा इशारा
महाविकास आघाडी सरकार जावं असं मी म्हणणार नाही, कारण…; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य
अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मनसेची मागणी