शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली; शिवसेना भवनासमोरील राड्यावरून आशिष शेलारांचा हल्लाबोल

0
251

मुंबई : राम मंदीराच्या मुद्दयावरून मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात पुकारलेल्या मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर हल्लाबोल केला.

भाजप युवा मोर्चाने पोलिसांना सूचना देऊन आंदोलन केलं होतं. मात्र शिवसैनिकांनी पोलिसांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यावरुन शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे., असा घणाघात आशिष शेलारांनी यावेळी केला.

दरम्यान, ज्यावेळी सोनिया आणि वाड्रा आपले देव होतात. त्यावेळी साठे, तेंडुलकर हे शिवसेनेचे शत्रू होतात, अशी घणाघाती टीका आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केलीय. लाथों के भूत बातोंसे नही मानते, यापुढे त्यांना लाथांनीच उत्तर मिळेल, असा इशारा शेलारांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेना भवनासमोर राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप”

मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे- खासदार धैर्यशील माने

अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या करिअरवर नांगर फिरवण्याचं काम केलंय- गोपीचंद पडळकर

“मराठा मोर्चाला सुरूवात, प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटलांची उपस्थिती, काळे कपडे घालून मुकमोर्चा सुरू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here