Home महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे- खासदार धैर्यशील माने

मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे- खासदार धैर्यशील माने

कोल्हापूर : मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज कोल्हापुरात निघत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा निघणार आहे. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व प्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होतील. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे. हे नक्कीच यशस्वी होईल., असा विश्वास धैर्यशील माने यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, आरक्षण कोणामुळे थांबलं, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही हा समाजाला प्रश्न. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असंही धैर्यशील माने यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“मराठा मोर्चाला सुरूवात, प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटलांची उपस्थिती, काळे कपडे घालून मुकमोर्चा सुरू”

अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या करिअरवर नांगर फिरवण्याचं काम केलंय- गोपीचंद पडळकर

“ठाकरे सरकारमधील तीन पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायले हवेत, कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”

मराठा आरक्षणाला वंचितचा पाठिंबा! मराठा मोर्चात आता प्रकाश आंबेडकर स्वत: उतरणार”