Home पुणे मुंबई-पुणे महापालिका निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?; संजय राऊतांचं महत्वाचं विधान

मुंबई-पुणे महापालिका निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?; संजय राऊतांचं महत्वाचं विधान

पुणे : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. भाजप विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, या बद्दल त्यांनी आज विधान केलं. ते पुण्यात बोलत होते.

आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील. त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करु, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

ज्या शहरात, ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले. मुंबई, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद कमी आहे असंही संजय राऊत म्हणाले.

पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, या बद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करु, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकत्र निवडणुकू लढलो तरच निश्चित सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हांला तुमची जागा दाखवेल; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात

महिलेकडून Covid-19 चं उल्लंघन; पोलिसानं दंड न करता Kiss करून सोडलं अन् झाला सस्पेंड

चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानावर नवाब मलिक यांच प्रत्युत्तर; म्हणाले…

“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, त्यातील एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”