Home महाराष्ट्र “52 लोक शरद पवारांना सोडून गेले, त्यातील एकही आमदार झाला नाही हा...

“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, त्यातील एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”

मुंबई : 52 लोक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना सोडून गेले होते. त्यातील एकही आमदार म्हणून निवडून आला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा होता त्यात बोलताना त्यांनी नवी मुंबईत सत्ता परिवर्तन 1 हजार 1 टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.

शरद पवार यांना राजकारणात येऊन 55 वर्षे झाली. त्यातली 25 वर्ष सत्तेत गेली, तर 25 वर्ष विरोधात गेली. या 55 वर्षात महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांना कधी अंतर दिलं नाही. ही गोष्ट राष्ट्रवादी पक्षातील सर्वांनी कुटुंब म्हणून लक्षात ठेवली पाहिजे, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, पक्षात दीड वर्षांपूर्वी कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही अशी परिस्थिती होती. रोज उठून आज कोण पक्षातून गेला याची चिंता असायची आणि कोण पक्ष सोडून गेला नाही की बरं वाटायचं, असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

…ते फक्त नावालाच शिवजयंती साजरी करणार; निलेश राणेंची टीका

नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं; चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा

हे सरकार दारुडं सरकार आहे; सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल

आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण…; सदाभाऊ खोतांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर