शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

0
143

मुंबई : मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, असं म्हणत शिवसेना नेते अनिल परब यांनी मनसेवर टीका केली होती. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. तसेच मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना झाली आहे., असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेनं हिंदुंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना स्वबळावर सत्ता आणणार असं सांगितलं होतं. पण आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत बसले आहेत, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे.

दरम्यान, आज ‘कृष्णकुंज’चं महत्व वाढल्यामुळेच शिवसेनेच्या पोटात दुखत आहे, असा खोटक टोलाही संदीप देशपांडेंनी लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

3 महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो- रावसाहेब दानवे

“शरद पवारांना ‘जे’ छोटे नेते म्हणालेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही”

“शहीद जवान ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटींची मदत देणार”

भाजपला सांगितलं होतं पवारसाहेबांचा नाद करु नका, पण ते सुधारणार नाहीत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here