Home महाराष्ट्र “शरद पवारांना ‘जे’ छोटे नेते म्हणालेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं...

“शरद पवारांना ‘जे’ छोटे नेते म्हणालेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही”

202

मुंबई : राजकारणात येण्यापूर्वी पवार मला मोठे नेते वाटायचे. परंतु राजकारणात आल्यावर कळलं ते फार छोटे नेते असून त्यांचा अभ्यासही नसतो, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांना जे छोटे नेते म्हणालेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही. इतक्या छोट्या नेत्याला केंद्र सरकारने भारतरत्न नंतरचा सर्वात मोठा नागरी सन्मान दिलाय. कदाचित हे पाटील यांना माहित नसावं, असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि भाजपमध्ये वैचारिक दरी निर्माण झाली असावी. किंवा मोदी सांगतायत तो संदेश यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. किंवा नरेंद्र मोदींना हे जुमानत नाहीत असं दिसत आहे., असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शहीद जवान ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटींची मदत देणार”

भाजपला सांगितलं होतं पवारसाहेबांचा नाद करु नका, पण ते सुधारणार नाहीत”

“साऊथ सुपर स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना ठरली नॅशनल क्रश”

राजकारण करायचं नाही, सगळं सुरू करतो, जबाबदारी घेता का?; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल