Home महाराष्ट्र हेच काय आपले प्रजासत्ताक?; शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

हेच काय आपले प्रजासत्ताक?; शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई : आज 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली. यावरूनच सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे.

केंद्रातील सरकारने एक पाउल मागे घेतले असते तर आज राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच संचलन आणि शेतकऱ्यांचा आक्रोश एकाच वेळी दिसला नसता, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्रावर टीका केली आहे.

नोटाबंदी, जीएसटी आणि लाँकडाउन यामुळे देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या मनातही आक्रोश आहेच. रशियासारख्या पोलादी देशातील जनताही तेथील राजवटीच्या विरोधात माँस्कोच्या रस्त्यावर उतरलीच, हे समजुन घ्यायला हवे, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आज आपल्या देशाच्या राजधानीत शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्याच्या पाठिंब्यासाठी राज्यराज्यांच्या राजधानीतही शेतकऱ्यांचे धडक मोर्चे निघत आहेत. हे चित्र बरे नाही, उद्या हा वणवा आणखीही पसरु शकतो. हे खरेच प्रजासत्ताक आहे का?  असा सवालही शिवसेनेने यावेळी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर- अतुल भातखळकर

अमृता फडणवीसांची ठाकरे कुटुंबावर टीका; म्हणाल्या…

“हा कायदा व तुम्ही या दोघांनाही देशातला सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त करेल”

रामदास आठवले यांनी माफी मागावी; आठवलेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक