मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने राज्यभरातील शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केलं.
घटनेची पायमल्ली करून हा कायदा आणण्याचा प्रयत्न झाला. संसदीय संकेत उद्ध्वस्त करत बहुमताच्या जोरावर कायदा पास करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या देशातला सर्वसामान्य माणूस हा कायदा व तुम्ही या दोघांनाही उद्ध्वस्त करेल, असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
घटनेची पायमल्ली करून हा कायदा आणण्याचा प्रयत्न झाला. संसदीय संकेत उद्ध्वस्त करत बहुमताच्या जोरावर कायदा पास करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या देशातला सर्वसामान्य माणूस हा कायदा व तुम्ही या दोघांनाही उद्ध्वस्त करेल. #MahaWithFarmers #FarmersProtests pic.twitter.com/ocdbpR3BTh
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 25, 2021
महत्वाच्या घडामोडी-
रामदास आठवले यांनी माफी मागावी; आठवलेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक
“ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही”
“राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण लवकरच पक्षात परत येणार”
गायींची जशी पूजा केली जाते, तशी शेतकऱ्यांची पूजा करायला हवी- अबु आझमी