आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : हिंदुंचा ज्याने क्रुर पद्धतीने छळ केलास अशा हिंदुद्वेष्ट्या टीपू सुलतानचे नाव मालाडमधील उद्यानाला देण्याचा घाट मालाडचे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी अनधिकृतपणे घातला असून महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये ‘वीर टिपू सुलतान उद्याने’ उभी राहतायत यावरून सत्तेसाठी शिवसेना ‘लाचारसेना’ झाली, अशी घणाघाती टीका भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाषणात बोलतात तर त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातच हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या आक्रमकांचे उदात्तीकरण केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची समृद्ध परंपरा असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा धर्मांध प्रवृत्ती फोफावताना दिसत आहेत. स्थानिकांनी या नामकरणाला विरोध केला असतानाही आमची हिंदुत्वाची भूमिका कायम असल्याच्या वल्गना करणाऱ्या शिवसेनेने मात्र, यावर सोयीस्कररीत्या मौन बाळगले आहे, असंही प्रभाकर शिंदे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : मोठी बातमी! सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
दरम्यान, यापूर्वी गोवंडी येथील महापालिकेच्या उद्यानास टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या बाजार उद्यान समितीच्या सभेत प्रस्ताव आला असता शिवसेनेने या विषयाला बगल देत पळ काढला व प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचार्थ पाठवला होता. त्यावेळी भाजप नगरसेवकांनी प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याकरिता उपसूचना मांडण्यासाठी वारंवार मागणी करूनही त्यांना बोलू दिले नाही. त्यावेळी भाजपा सदस्यांनी बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांना घेराव घालून याबाबत जाब विचारला होता. आता भाजपा रस्त्यावर उतरून ही लढाई लढेल असा इशाराही प्रभाकर शिंदे यांनी यावेळी दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कमळ फुलणार की धनुष्यबाण कमळाचा वेध घेणार हे निवडणूकीत कळेलच; किशोरी पेडणेकरांचं भाजपला प्रत्युत्तर
औरंगाबाद पालिकेवरचा भगवा उतरू देणार नाही, लवकरच संभाजीनगरला येणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही; धनंजय मुंडेंचा पलटवार