Home महाराष्ट्र “आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे, यावेळेस सुद्धा शिवसेनाच बहुमताने महापालिकेत सत्तेत येणार”

“आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे, यावेळेस सुद्धा शिवसेनाच बहुमताने महापालिकेत सत्तेत येणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. यानंतर बोलताना महापालिकेवर स्वबळावर लढून मुंबईवर कब्जा करण्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. यावरून शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कोण काही बोलत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा संबंध आहे. कार्यकर्त्यांची ऊर्जा वाढवण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. बऱ्याच पक्षातून इकडून तिकडून आलेल्या नेत्यांना थोपवण्यासाठी ते अशी वक्तव्य करत असतील, असा टोला पेडणेकरांनी यावेळी लगावला. पेडणेकरांच्या हस्ते आज महापाैर यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी टी.व्ही.9 मराठीशी संवाद साधला.

हे ही वाचा : सत्तेसाठी शिवसेना ‘लाचारसेना’ झाली; भाजपाची घणाघाती टीका

दरम्यान, गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वात शिवसेना सत्तेत आहे. आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे या वेळेस सुद्धा शिवसेना बहुमताने पालिकेत सत्तेत येईल हा आमचा विश्वास आहे, असंही पेडणेकर यांनी यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

कमळ फुलणार की धनुष्यबाण कमळाचा वेध घेणार हे निवडणूकीत कळेलच; किशोरी पेडणेकरांचं भाजपला प्रत्युत्तर

औरंगाबाद पालिकेवरचा भगवा उतरू देणार नाही, लवकरच संभाजीनगरला येणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे