आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गोव्यात भाजपाला बहुमत मिळालं असून, भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. या पार्श्वभूमीवर गोवा भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची एकत्रित मतं जरी बघितली तरी नोटा पेक्षा ती कमी आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
हे ही वाचा : “पंजाबमध्ये AAP जिंकल्याचं नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना दुख:”
मागील वेळेपेक्षाही जास्त मतं आम्ही मिळवले आहेत. याचा अर्थ असा आहे की आम्ही केवळ कोणत्या मत विभागणीवरून आलेलो नाहीत. सकरात्मक मतांवर भाजपा निवडून आलेली आहे आणि मला गोष्टीचा देखील आनंद आहे, की आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील विजयी झाले आहेत. मला विश्वास आहे गोव्यात एक चांगलं सरकार आम्ही स्थापन करू, असंही देवेंद्र फडणीवस म्हणाले आहेत.
दरम्यान, भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आजच राज्यपालांची भेट घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
जबतक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…; चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं
शिवसेना जिथे जिथे जाते, तिथे डिपॉझिट जप्त होते; रावसाहेब दानवेंची टीका
“पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची विजयी घाैडदाैड; काँग्रेस, भाजपला धक्का”