Home महाराष्ट्र शिंदे गट- शिवसेनेचा वाद; मनसेची प्रतिक्रिया

शिंदे गट- शिवसेनेचा वाद; मनसेची प्रतिक्रिया

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : प्रभादेवी परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी सकाळी राडा झाला होता. या घटनेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दादार, प्रभादेवी, माहीम हे सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. अशा हाणामाऱ्या करायला हे काय बिहार राज्य नाही, पोलिसांनी दोषींवर योग्य ती कारवाई करावी, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : शिंदे सरकारला मोठा धक्का ; ‘या’ कारणांमुळे झाला तब्बल 12 हजार कोटींचा दंड

शिवसेनेने अडीच वर्षात जे पेरलं ते आता उगवतंय, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी यावेळी  लगावला आहे.

दरम्यान, या दोन्ही गटात मध्यरात्री पुन्हा हाणामारी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मनसे-भाजप युतीबाबत रामदास आठवलेंचं मोठं विधान, म्हणाले…

 “अजित पवार पुन्हा नाराज?; राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित दादांचं पुन्हा नाराजीनाट्य?”

“काहीही झालं तरी 2024 ला गुहागरचा आमदार हा मनसेचाच होणार”