शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार-काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात बंददाराआड खलबतं; चर्चांना उधाण

0
491

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी आज काँग्रेस नेते तसेच माजी मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अब्दुल सत्तार हे सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी अब्दुल सत्तार हे अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन पोहचले. चव्हाण यांच्या घरी जाऊन सत्तार यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांमध्ये बंददाराआड चर्चा झाली. त्यामुळे दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंना मोठा धकका; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने केली घरवापसी

दरम्यान, या भेटीनंतर अशोक चव्हाण हे माझे गुरू आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो अशी प्रतिक्रीया अब्दुल सत्तार यांनी दिली. तर, राजकारणात मतभेद असावेत पण वैयक्तीक मतभेद नसावेत, अशी अपेक्षा अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

… तर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई पच्श्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा

दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करणे भाजप नेत्याला पडले महागात; पत्नीने दिला चांगलाच चोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here