आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : सत्तेत असताना महाविकास आघाडी सरकारने वाईन विक्रीबाबत एक मोठा निर्णय घेतला होता.
सुपरमार्केटमध्ये वाईनची विक्री करण्यास महाविकास आघाडी सरकारने परवानगी दिली होती. या निर्णयाला अनेक संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे सरकारने सर्वसामान्य नागरिकांकडून हरकती मागवल्या होत्या. या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच आता राज्यात नव्याने स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस सरकार हा निर्णय मागे घेणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : शिवसेना म्हणजे अंगार, आगीशी कोण खेळणार असेल तर…; भास्कर जाधवांचा इशारा
वाईन विक्रीचं धोरण मागील राज्य सरकारने आणलं होतं. हा उत्तम निर्णय होता. पण काही कारणास्तव तो अंमलात आला नाही, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, आजही देशातील 60 टक्के जनता शेती करते. जगाची आणि देशाची लोकसंख्या पाहता, शेतकऱ्यांचा आकडा दुर्लक्ष करुन चालणार नाही. लोकसंख्या वाढत असताना शेतीवर बोजा किती टाकायचा याचाही विचार केला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जयंत पाटलांसोबत, भाजपच्या ‘या’ 2 आमदारांची उपस्थिती; चर्चांना उधाण
काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सूरूच; गुलाम नबी आझादनंतर आता ‘या’ मोठ्या नेत्यानं दिला राजीनामा