आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
अजित पवारांच्या या बंडानंतर राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. एक अजित पवारांचा, तर दुसरा शरद पवारांचा. यानंतर अनेक घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता शरद पवार मैदानात उतरले आहेत.
ही बातमी पण वाचा : दरडीचा अंदाज येत नसेल तर…; राज ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका
राष्ट्रवादी फूटीनंतर, शरद पवारांनी, राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. पवारांनी आपल्या या दौऱ्याची पहिली सभा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये घेतली होती. त्यानंतर आता पवारांनी आपला मोर्चा अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वळवला आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला असलेल्या गोंदिया जिल्हाकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. गोंदियामधून पवारांना, कोण पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागूृन होतं. गोंदियात शरद पवार गटाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव वीरेंद्र जायस्वाल हे करत आहेत.
दरम्यान, सुरुवातीला वीरेंद्र जायस्वाल यांनी देखील अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. मात्र ते आता पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे आले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
किरीट सोमय्यांच्या व्हिडीओवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी असे किळसवाणे आणि…”