मुबंई : चिनी सैनिकांसोबत सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. चिनी सैनिकांसबोत संघर्ष करताना हुतात्मा झालेल्या जवानांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये चिनी अतिक्रमणापासून आपल्या सीमेचे रक्षण करताना भारतीय लष्करी अधिकारी व जवानांना वीरगती मिळाली. आपलं सैन्यदल धैर्याने आणि दृढनिश्चयाने भारतीय सीमांचे रक्षण करत आहे. वीरमरण प्राप्त सैनिकांना मानवंदना व भावपूर्ण श्रद्धांजली!, असं म्हणत पवारांनी वीरमरण प्राप्त सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, दोन्ही देशांनी गलवान खोऱ्यातून आपापले सैन्य माघारी बोलावले आहेत. भारतीय लष्कराने याबाबतची माहिती दिली आहे.
लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये चिनी अतिक्रमणापासून आपल्या सीमेचे रक्षण करताना भारतीय लष्करी अधिकारी व जवानांना वीरगती मिळाली. आपलं सैन्यदल धैर्याने आणि दृढनिश्चयाने भारतीय सीमांचे रक्षण करत आहे. वीरमरण प्राप्त सैनिकांना मानवंदना व भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मोठी बातमी…! गलवान खोऱ्यातून भारत आणि चीनचे सैन्य माघारी
जॉन सीनानेही वाहिली सुशांतसिंग राजपूतला श्रद्धांजली; पोस्ट व्हायरल
वंचित बहुजन आघाडीची राज्यव्यापी आंदोलनाची हाक
शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे… ; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर निशाणा