आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
अजित पवारांच्या या बंडानंतर राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. एक अजित पवारांचा, तर दुसरा शरद पवारांचा. तेव्हापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकास्र डागत आहेत. अशातच आता मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
ही बातमी पण वाचा : नितीन गडकरींना आम्ही पंतप्रधान करू, फक्त त्यांनी…; ठाकरे गटाकडून मोठी ऑफर
शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात, अशी टीका वळसे पाटलांनी यावेळी केली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या., असंही वळसे पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
“ठाकरे गटाला दिलासा, भाजपमधील ‘हा’ मोठा नेता पुन्हा ठाकरेंकडे घरवापसी करणार”
“ब्रेकींन न्यूज! आयुष्यमान भारतसह, मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा; कॅगच्या अहवालाने खळबळ”
“बाॅम्ब घेऊन तयार रहा, आलेल्या लोक प्रतिनिधींवर बाॅम्ब हल्ला करा; ‘या’ माजी आमदाराचा अजब सल्ला”