मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पहिल्यांदाच पक्षाच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवार यांनी मंत्र्यांना सरकारच्या कारभाराबाबत मंत्र्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
भाजपच्या कार्यकाळात जे प्रकार सुरू होते ते आपल्या कार्यकाळात होता कामा नयेत, असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे. अशा प्रकारांमुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे त्या चुका टाळायला हव्यात, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला.
दरम्यान, एखाद्या प्रकरणात कारवाई करताना त्याची नीट माहिती घ्या. दोन-चार अधिकाऱ्यांवर अवलंबून राहू नका. फ्री काश्मीर म्हणजे आझाद काश्मीरची भूमिका नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-दिपीका पादुकोणचा विद्यार्थ्यांना पाठिंबा,जेएनयूमध्ये लावली हजेरी
-देवेंद्र फडणवीस यांना उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे- अनिल गोटे
-राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, मनसे भाजपसोबत जाणार?
-स्वतंत्र काश्मीरवरुन निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा, म्हणतात…