आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अमरावती : ‘मी मोदीला मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी नाना पटोलेंवर टिका केली. अशातच माजी कृषी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनीही नाना पटोलेंवर टीका करताना वादग्रस्त शब्द वापरले आहेत.
काँग्रेस नेत्यांमध्ये कुत्र्यांसारखी भुंकायची स्पर्धा लागली आहे. सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत लागली आहे. असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले; अमृता फडणवीसांचा टोला
“नाना पटोले याने तर हद्दच केली मी मालकीणीचा सगळ्यात प्रामानिक कुत्रा आहे. म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली. पण, नानांनी लक्षात ठेवावं शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोर निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव, असा इशाराही अनिल बोंडे यांनी यावेळी दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“नाना पटोलेंचं वक्तव्य हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, पोलिसांनी त्यांना अटक करावी”
मी शांत बसलो आहे, पण…; मराठा आरक्षणावरुन संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा
नितेश राणेंना पुन्हा न्यायालयाचा दणका; उच्च न्यायालायानेही नितेश राणे यांचा अर्ज फेटाळला