Home पुणे मी शांत बसलो आहे, पण…; मराठा आरक्षणावरुन संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

मी शांत बसलो आहे, पण…; मराठा आरक्षणावरुन संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मराठा समाजाचे मूलभूत पाच प्रश्न मी सरकारच्या पुढे मांडले होते. अजूनही ते प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. मी शांत बसलो आहे पण वेळप्रसंगी यावर बोलेन अशी प्रतिक्रिया छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिली आहे. पुण्यात बालेवाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना ते बोलत होते.

आत्महत्या केलेल्या मुलाला दहा लाख रुपये देण्याचे एकच काम सरकारने केले आहे, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांना निर्णय घ्यावा नाहीतर मराठा समाज गप्प बसणार नाही, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : नितेश राणेंना पुन्हा न्यायालयाचा दणका; उच्च न्यायालायानेही नितेश राणे यांचा अर्ज फेटाळला

सगळ्या मराठ्या समाजाच्या संघटनांना मराठा आरक्षणार बोलण्याचा अधिकार आहे. मी सुद्धा सरकारला अनेकवेळा सांगितले आहे की, आरक्षण हा वेगळा टप्पा आहे ते लगेच लागू होऊ शकत नाही. पण मूलभूत पाच प्रश्न मी सरकारच्या पुढे मांडले होते. अजूनही ते प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. मी शांत बसलो आहे. लोकंसुद्धा मला विचारत आहेत की शांत का बसला आहात. पण वेळप्रसंगी मी यावर बोलेन. सरकारकडून अनेक गोष्टी अशा घडत आहेत ज्या बरोबर नाहीत. लवकरात लवकर त्यांना निर्णय घ्यावा नाहीतर मराठा समाज गप्प बसणार नाही, असंही संभाजीराजे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

मी नरेंद्र मोदींबद्दल बोललो नाही; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

“पवारांनी आधी फडणवीसांना कात्रजचा घाट दाखवला, आता काशीचा घाट दाखवतील”

“ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”