मुंबई : महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं. परंतु, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असं वादग्रस्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी काल बोलताना केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच पेटलंय. राज्यात ठिकठिकाणी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. यावर आता सत्ताधारी पक्षातील आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तिरंग्याचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. संभाजी भिडेना बेड्या ठोकल्या पाहिजेत, असं बच्चू कडू म्हणाले.
संभाजी भिडे यांचं स्वातंत्र्यामध्ये योगदान काय आहे? कधी लाठी तरी खाल्ली आहे का? अशाप्रकारे बोलत असेल तर त्यांच्या नांग्या तिथेच ठेचल्या गेल्या पाहिजेत. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी यावर बोलले पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, हे जर थांबल नाही तर संभाजी भिडे विरोधात आम्ही रोखठोक भूमिका घेऊ. सहा महिने तरी संभाजी भिडे यांना देशाच्या बाहेर ठेवलं पाहिजे, असं म्हणत बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –