अनुष्काचा हा फोटो पाहून विराट कोहली ‘क्लीन बोल्ड’; म्हणाला…

0
176

मुंबई : कोरोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत घरातच आहे.

विराट आणि अनुष्का ही जोडी त्यांच्या एकमेकांवरील प्रेमामुळे कायम चर्चेत असते. चाहत्यांच्या गराड्यात असो किंवा सोशल मीडियावर असो, दोघेही एकमेकांवर असलेले प्रेम मुक्तपणे व्यक्त करतात.

अनुष्काने एक छानसा फोटो पोस्ट केला. याच फोटोच्या संदर्भात तिने कॅपशन लिहिली आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मला घरातल्या सूर्यप्रकाशाच्या जागा माहीत झाल्या आहेत, असे तिने फोटोखाली लिहिले आहे.अनुष्काचा हा फोटो पाहून विराट ‘क्लीन बोल्ड’ झाला. विराटला या फोटोवर काय रिप्लाय करावा यासाठी शब्द सुचले नाहीत. त्यामुळे त्याने थेट एक लाल बदामाचे ईमोजी आणि एक डोळ्याच्या जागी लाल बदाम असलेले इमोजी अशी कमेंट करत आपलं प्रेम व्यक्त केलं.

दरम्यान, तिच्या या फोटोवर 5 तासांतच 16 लाख चाहत्यांनी लाईक केले, तर आठ हजार चाहत्यांनी कमेंट केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सोनू सूदचा चेहरा पुढे करून ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न – संजय राऊत

“मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनासारख्या प्रभावी रोगाचा मुकाबला केला”

आईचा चिमुकलीला दम; मुख्यमंत्र्यांचा थेट वडिलांना फोन, म्हणाले… आमच्या शिवसैनिकांना का त्रास देता?

… आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिले मंत्रीही तुम्हीच- अतुल भातखळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here