संजय शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार?; सुषमा अंधारेंनी केली महिला आयोगाकडे तक्रार दाखल

0
267

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली होती. मात्र, आता त्यांना ही टीका भोवण्याची शक्यता आहे.

संजय शिरसाट यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. अंधारे यांनी स्वत: ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

हे ही वाचा : आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसला तुम्ही पाठिंबा दिला, मग आता का…; मनसेचा उद्धव ठाकरेंना सवाल

संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली भाषा ही व्यक्तीशः मलाच नाही तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी आणि बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी भाषा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील ‘या’ अभिनेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

सत्तेसाठी उध्दव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजपच्या ‘या’ नेत्याचा आरोप

…म्हणून मी चंद्रकांत पाटलांबरोबरच्या बैठकीतून बाहेर पडलो; रवींद्र धंगेकरांनी केला खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here