Home महाराष्ट्र औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींना संजय राऊतांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींना संजय राऊतांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगाबाद दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत इम्तियाज जलील, हे देखील उपस्थित होते. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे तुम्ही दिलेलं आव्हान असून आपण स्वीकारलं असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. तसंच औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं हे विसरु नका, असा इशाराही संजय राऊतांनी एमआयएमच्या नेत्यांना यावेळी दिला.

हे ही वाचा : रायगडमध्ये शिवसेनाला मोठा धक्का; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला दोन वर्षांची शिक्षा

संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सर्वांना, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकत महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं ओवेसी बंधूंचं राजकारण दिसत आहे., अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली.

दरम्यान, पण मी इतकंच सांगेन की, औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत आम्ही टाकलं आहे. तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये”

राज ठाकरेंची वाढती सुरक्षा पाहून मनसे नेते बाळा नांदगावकर संतापले, म्हणाले…

राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी- रामदास आठवले