Home महाराष्ट्र राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी- रामदास आठवले

राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी- रामदास आठवले

515

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना, मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. यावरून भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया देत राज यांच्या अयोध्या दाैऱ्यास विरोध केला. या सर्व प्रकरणावरून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी यावेळी दिली. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : पवार साहेब महाराष्ट्राला तुमच्या राजकारणाचा किळस आलाय; निलेश राणेंचा हल्लाबोल

राज ठाकरे यांना एवढ्या दिवसांनी अयोध्या आठवली आहे, त्यांना अयोध्याला जायचं आहे. पण त्यांनी यापूर्वीच अयोध्याला जायला हवं होतं. त्यांच्या विरोधात उत्तर भारतीयांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. आपण भारतात राहणारे सर्व भाषी एकच आहोत याचा विचार त्यांनी करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्रीयांनी केला नव्हता, तेव्हा उत्तर भारतीय ब्राह्मण असणाऱ्या गागाभट्टांनी केला होता हा इतिहास लक्षात ठेवायला हवा, असा सल्लाही रामदास आठवलेंनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपची यशस्वी खेळी; राष्ट्रवादी आणि मनसेच्या ‘या’ नेत्यांनी हाती घेतलं कमळ”

‘भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष’; भाजपच्या माजी आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

“मनसेचा विजयी झेंडा फडकला, ‘या’ निवडणूकीत मनसेनं 13 पैकी 13 जागांवर मारली बाजी”