संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा घ्या; नवनीत राणा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
195

अमरावती : अभिनेत्री कंगणा रणाैतच्या कार्यालयावर आज मुंबई महापालिकेने कारवाई केली. यावर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

कंगना रनौत यांच्या कार्यालयावरील बीएमसीने केलेली कारवाई चुकीची असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचा संजय राऊत यांना पाठिंबा आहे का? त्यांनी आता संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा मागायला पाहिजे, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी महिलांचा अपमान केला आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र राज्याचा ठेका घेतला आहे का? ते वारंवार महिलांचा अपमान करत आहेत, आपली मर्यादा सांभाळा, असा इशारा नवनीत राणा यांनी संजय राऊतांना दिला.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल; कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

…तर पुढचं अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्यावं; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस; चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस; चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here