“संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी, ममता बॅनर्जींसोबत मुंबईत, तर राहुल गांधींसोबत सुरात सूर मिसळतात”,

0
266

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 2 दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत व राहुल गांधींवर निशाणा साधला.

हे ही वाचा : नवी मुंबईत बीएमडब्ल्यू गाडीच्या गोदामाला भीषण आग; 45 गाड्या जळून खाक

संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील हे काल सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर होते. फलटण येथील भाजपच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राहुल गांधी व संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं.

महत्वाच्या घडामोडी –

पवार कुटुंबच ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

“राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वसामान्य रिक्षावाल्याला केलं उपनगराध्यक्ष”

भाजप नेत्याची लेक होणार ठाकरे घराण्याची सून; 28 डिसेंबरला मुंबईत विवाह सोहळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here