मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. तब्बल 15 दिवसांनी वनमंत्री संजय राठोड यांनी समोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
माझी, माझ्या कुटुंबाची तसेच माझ्या समाजाची कृपा करुन बदनामी करु नये अशी विनंती संजय राठोड यांनी यावेळी केली. यावर निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
शिवजयंतीला शिवनेरीवर 144 कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही… ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ आहे., असं ट्विट करत निलेश राणेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शिवजयंतीला शिवनेरीवर १४४ कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही… ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहे का?; प्रवीण दरेकरांचा सवाल
“नोकरीच्या देण्याच्या आमिषाने तरूणीला कारमध्ये बसवलं, चालत्या कारमध्ये केला बलात्कार”
“सांगली महापाैर निवडणुकीच्या दिवशीही भाजपचे 7 नगरसेवक नाॅट रिचेबल; सत्ताधाऱ्यांचे टेंशन कायम”