फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला हे सिद्ध करुन दाखवणार- सचिन सावंत

0
187

मुंबई : मुंबई मेट्रो प्रकल्पाभोवती मागची 5 वर्षे फडणवीस सरकारने राजकारण केलं आणि मुंबईकरांना फसवलं असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबई मेट्रो प्रकल्पाभोवती मागची 5 वर्षे फडणवीस सरकारने राजकारण केलं आणि मुंबईकरांना फसवलं, असं सचिन सावंत म्हणाले. तसेच एवढंच नाही तर मी माझं हे म्हणणं कागदोपत्री सिद्ध करुन दाखवेन असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मेट्रो कारशेडबाबत केंद्र सरकारने राज्याला पत्र पाठवण्यामागे ही राजकारण आहे. त्या जागेवर 1969 पासून राज्य सरकारचा अधिकार आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच आता केंद्र सरकार या जागेवर आपला दावा सांगत आहे, असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपवर आरोप केले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

एलिमिनेटर! सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

पाकिस्तानपेक्षा भाजपला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो- बाळासाहेब थोरात

“अभिनेत्री अमृता रावने मुलाच्या पहिल्या फोटोसोबत शेअर केलं त्याचं नाव”

तुमच्यात दम असेल तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं योगी आदित्यनाथांना खुलं आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here