सांगलीत भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे…

0
385

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ राष्ट्रवादीला भाजपाने मोठा धक्का दिला आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीत मध्ये दहा महिन्यापूर्वी एकतर्फी सत्ता मिळवणाऱ्या रोहित पाटील गटाला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जबरदस्त धक्का बसलाय.

हे ही वाचा : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे आले एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या गटाच्या सिंधुताई गावडे यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप पराभूत झाले आहेत.

दरम्यान, दहा महिन्यांपूर्वी झालेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी बाजी मारली होती.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शरद पवारांच्या गुगलीवर कोण क्लीनबोल्ड होणार?, ठाकरे की शिंदे?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

“राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

“उद्धव ठाकरेंचा मोठा डाव; एकनाथ शिंदेंच्या कट्टर विरोधकासह अनेक नेत्यांनी केली शिवसेनेत घरवापसी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here