रोहित पवार तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही महाराष्ट्राला सल्ले देऊ नकात- गोपीचंद पडळकर

0
571

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाला. स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात महागाईच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने आंदोलन केलं. यावरून राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पहायला मिळालं. यावरून आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली होती. यावरून आता गोपीचंद पडळकरांनी पलटवार केला आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल”

कोण रोहित पवार? रोहित पवारांना जरा लाज तरी वाटली पाहिजे. तुमच्या कार्यकर्त्याने माझ्या गाडीवर दगडफेक केली तर तुम्ही त्याचा सत्कार केलात आणि आम्हांस संस्कृती सांगताय. तुम्ही महाराष्ट्राला संस्कृती शिकवू नका. तुम्ही जे पेरताय ते उगवते. तुमचा कार्यकर्ता शोधा आणि तोडा असा आदेश काढतो, काल सभेत सदाभाऊ बोलत असताना तुम्ही तिथे जाऊन विरोध करताय. एवढा माज, एवढी मस्ती येते कुठून?, रोहित पवार तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही महाराष्ट्राला सल्ले देऊ नकात, असा टोलाही गोपीचंद पडळकरांनी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदारांच्या कारचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

मनसेची ताकद वाढली; नागपूरमधील अनेक महिलांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

देवेंद्र फडणवीसांच्या वजनावर काही बोलू नका, नाहीतर…; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here