हिला आवर घाला नाहीतर…; गाैतमी पाटीलच्या ‘त्या’ डान्सवर मनसे आक्रमक

0
1408

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या गौतमी पाटीलवर अनेकांकडून टीका होत आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीच्या त्या अश्लील डान्सची क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. अशातच आता मनसेनं गौतमीवर जोरदार निशाणा साधला आहे.

गौतमीच्या डान्सला आवर घाला, अन्यथा गृहमंत्रालयाच्या कार्यालयाच्या काचा फोडू, असा थेट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. मनसे विद्यार्थी सेनेनं ही आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत मनसे विद्यार्थी सेनेकडून पोलीस महासंचालकांकडे पत्र लिहून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र बंदच्या इशाऱ्यानंतर, खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्व काकडे यांनी जालन्यातील सेवली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकामार्फत पोलीस महासंचालकांडे तक्रार दाखल केली आहे. यावेळी ते म्हणाले की, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अनेक कलाकार आपली संस्कृती जपत कला सादर करतात. मात्र गौतमी पाटील हेतू पुरस्पर अश्लील हावभाव करत आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राष्ट्रवादीला मोठा धक्का; शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सोडली, पक्षाची साथ”

…तर महाराष्ट्र बंद पाडू; उद्धव ठाकरेंचा इशारा

विक्रम गोखलेंच्या निधनाची बातमी चुकीची; प्रकृतीबाबत पत्नीने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here