आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे गेल्या काही दिवसांपासून महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात फिरत आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन निशाणा साधत आहेत.
अशातच सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज सिंधुदुर्गातील कणकवली येथे दाखल झाली. या सभेत बोलताना अंधारे यांनी, भाजप व शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. तसेच यावेळी अंधारेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख करत पोलिसांवरही निशाणा साधला.
हे ही वाचा : मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; चर्चांना उधाण
“पोलीस म्हटले तुम्ही पंतप्रधानांची नक्कल करता. तुमच्यावर केस टाकली. आता पोलीस डिपार्टमेंटचा कॅमेरा चालूय. पण या डिपार्टमेंटच्या कॅमेऱ्याला एक गोष्ट दिसत नाही का, आम्ही नुसते प्रश्न विचारले. मी तर एकदम म्हणजे त्यांच्यासमोर काहीच नाही, असे आमचे चुलत भाऊ असणारे राज भाऊ यांचा नकालांमध्ये कुणी त्यांचा हात धरतील का? त्यांच्यावर केस टाकण्याची पोलिसांनी हिंमत केली का? तर नाही केली”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, पोलिसांचा नेमका प्रोब्लेम हा आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणायचा अर्थच यांना अजून कळलेला आहे की नाही, तेच कळत नाही. सज्जनांचं रक्षण करु आणि दुर्जनांचा नाश करु. हे जे गृह खात्याचं बीद्र आहे त्यापेक्षा पुढाऱ्यांचं रक्षण करुन आणि सर्वसामान्यांचा नाश करु, असं काही ब्रीद घेऊन गृहखातं काम करतंय असं वाटतंय, अशी टीका सुषमा अंधारेंनी यावेळी केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
कोश्यारीजी, माफी मागा, नाहीतर…; शिवाजी महाराजांबद्दल विधानावर, सामनातून इशारा
अखेर ठरलं! भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येणार; प्रकाश आंबेडकरांचं ठाकरेंसमोर विधान, चर्चांना उधाण
राहुल गांधींमुळे महाविकास आघाडी धोक्यात?; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ