आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल; हसन मुश्रीफ यांचा फडणवीसांना टोला

0
156

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी जाहीर केलेली मदत तोकडी आहे, असं म्हणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. याला प्रत्युत्तर देत फडणवीसांनी मनशांतीसाठी अध्यात्मिक पुस्तकं वाचावीत, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांना दिला आहे.

काही प्रसारमाध्यमांनी केलेल्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. हे देवेंद्र फडणवीस यांना खटकल्यानेच त्यांनी ही टीका केली आहे, असा म्हणत हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

मी काही दिवसांपूर्वीच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काही पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यांनी पुस्तक वाचण्याचा माझा सल्ला धुडकावलेला दिसतो आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“कोरोना संकट भारतावर असताना मोदींसारखे नेतृत्व लाभले हे देशाचे नशीबच”

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी युवराज सिंगने मागितली माफी!

रत्नागिरीसाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी तात्काळ मदत

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला राज्य सरकार जबाबदार- प्रविण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here